नमो नोकरी : MFS Admission 2024 | महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2024-25

MFS Admission 2024 तरुण व होतकरु तरुण उमेदवारांकरीता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामक / अधिकारी म्हणून कारकिर्द करु इच्छितात त्यांचेकरीता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण पाठयक्रम दरवर्षी आयोजित करतात. अग्निशामक पाठयक्रम (कालावधी ०६ महिने) व अधिकारी पाठयक्रम (कालावधी ०१ वर्ष हे दोन्ही पाठयक्रम निवासी असून या पाठयक्रमातून सार्वजनिक व औद्योगिक अग्निशमन सेवेमध्ये संधी मिळावी या दृष्टीकोनातून हे पाठयक्रम आयोजित करण्यांत येतात. 

MFS Admission 2024 | महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2024-25

MFS Admission 2024 अग्निशमन सेवेची वाटचाल बघता व त्याच प्रमाणात उंच इमारती, हॉस्पिटल, मॉल्स, मल्टीप्लेक्स व औद्योगिक क्षेत्रात अग्निशामक / अधिकारी यांची मोठया प्रमाणात मागणी असून त्या आधारे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित केले जातात. https://namonaukri.com/

भरतीसाठी एकूण जागा : 40+  जागा

65 653816 whatsapp button png image free download searchpng whatsapp removebgजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

पाठ्यक्रम : 

  1. अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम (फक्त पुरुष उमेदवारांकरीता) 
    1. ( कालावधी – जानेवारी २०२५ ते जुन २०२५ व जुलै-२०२५ ते डिसेंबर – २०२५) 
  2. उपस्थानक व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठयक्रम (फक्त पुरुष उमेदवारांकरीता – पाठयक्रमाची क्षमता ४० )
    1. ( कालावधी – जुलै-२०२५ ते जुन – २०२६)

उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स) पदाचे नाव & तपशील :

अ. क्र. कोर्सचे नाव  पद संख्या कालावधी
1 अग्निशामक (फायरमन) कोर्स 06 महिने
2 उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स 40 01 वर्षे
Total 40+

 

शैक्षणिक पात्रता:

MFS Admission 2024 खाली नमूद केल्याव्यतिरिक्त अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे व त्यास मराठी भाषा येणे गरजेचे आहे. सदर बाब शैक्षणिक व कागदपत्रांची पडताळणीच्या वेळी बघितली जाईल). 

  • अग्निशामक (फायरमन):
    • शैक्षणिक मान्यताप्राप्त संस्थेतून मराठी विषयासह पहिल्या प्रयत्नात किमान एस.एस.सी. उत्तीर्ण
  • उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी:
    • मान्यताप्राप्त विदयापीठातून पदवी उत्तीर्ण  

शारीरिक पात्रता:

कोर्सचे नाव  उंची  वजन  छाती 
अग्निशामक (फायरमन) 165 सें.मी. 50 kg 81/86  सें.मी
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी 165 सें.मी. 50 kg 81/86  सें.मी

 

वयाची अट: 

15 जून 2024 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/EWS: 03 वर्षे सूट]

  • अग्निशामक (फायरमन): 18 ते 23 वर्षे
  • उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे

वैद्यकीय मापदंड : 

  • डोळे : अर्जदार डोळयांनी रंगहीन नसून चष्म्याशिवाय दृष्टी ६ / ६ असणे आवश्यक आहे. 
  • कोणत्याही प्रकारचे कान, नाक व घसाचे आजारे नसणे. व्यवस्थित ऐकू येणे. या व्यतिरिक्त अर्जदार खाली दिलेल्या आजारातून मुक्त असणे गरजेचे आहे. 
  • हाडांचा किंवा सांध्याचा आजार. 
  • पूर्व मानसिक आजार 
  • त्वचेचा आजार 
  • सपाट पाय किंवा गुडघे टेकलेले 
  • रक्त वाहिनी फूगणे 
  • तिरकस डोळे 
  • कोणत्याही प्रकारचे शारीरिक व्यंगत्व नसावे. 
  • मोठया प्रमाणात शस्त्रकिंया झालेली नसावी 
  • ऐकू न येणे किंवा बोलतांना अडथळणे (बोबडेपणा) 
  • कोणत्याही प्रकारचे अपंगत्व, जेणेकरुन अग्निशमन किंवा विमोचन कार्य करतांना त्रास होऊ शकतो. 

परिक्षा शुल्क भरणा ( ना परतावा ) 

  • अग्निशामक (फायरमन) : 
    • खुला प्रवर्ग : ₹600/-
    • राखीव प्रवर्ग : ₹500/-
  • उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी : 
    • खुला प्रवर्ग : ₹750/-
    • राखीव प्रवर्ग : ₹600
  1. परीक्षा शुल्काचा भरणा हा फक्त Online पध्दतीनेच करावयाचा आहे. या नमूद केल्याप्रमाणे Online पध्दती व्यतिरिक्त इतर कोणत्याही पध्दतीने भरणा केलेले परीक्षा शुल्क हे विचारात घेतले जाणार नाही. 
  2. उमेदवाराने दोन्ही पाठयक्रमासाठी अर्ज केला असल्यास विहित केल्याप्रमाणे प्रत्येक पाठयक्रमासाठी त्याने परीक्षा शुल्क एकाच वेळी भरणे आवश्यक आहे. Online परीक्षा शुल्क भरण्याची पध्दती 
    •  क्रेडिट कार्ड 
    • डेबिट कार्ड 
    • इंटरनेट बँकींग 
    • युपीआय भिम 

MFS Admission 2024 उमेदवार आपल्या सोयीनुसार वरीलपैकी कोणत्याही एका पध्दतीनुसार शुल्क भरणा करु शकतात.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची कार्यपध्दती व सूचना :- 

MFS Admission 2024 इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या संकेतस्थळाच्या लिंकवर जाऊन दि. १५.०६.२०२४ ते दि. १५.०८.२०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरणे. 

संकेतस्थळ : 

Untitled design 5 1 e1734955020304जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

www.mahafireservice.gov.in 

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2024
  • शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी: 23 सप्टेंबर 2024 पासून
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :

महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट : ( Click Here )
जाहिरात (PDF) : ( Click Here )
Online अर्ज : ( Apply Online )

 

ऑनलाईन अर्ज भरताना महत्वाच्या सूचना 
  • MFS Admission 2024 जाहिरात व्यवस्थित वाचणे 
  • ज्या पाठयक्रमासाठी अर्ज करणार आहात त्या पाठयक्रमाच्या अटी व शर्ती व्यवस्थित तपासून घेणे. 
  •  फॉर्म भरण्याआधी User ID Password तयार करणे व फॉर्म भरताना व पुढील कोणतीही प्रक्रिया करताना त्याचा वापर करणे. 
  • अंतिम दिनांकाच्या अगोदर पूर्ण अर्ज शुल्कासह भरणे. भरलेले शुल्क परत केले जाणार  नाही 
  • आपण तयार केलेले User ID व Password ने नमूद केलल्या संकेस्थळावर प्रवेशासाठी अर्ज (Fill Application Form ) या शीर्षकाखाली फॉर्म पूर्णपणे भरुन झाल्यावर त्याची प्रिंट काढून स्वतःकडे एक प्रिंट ठेवणे (सदर अर्जाची प्रिंट शेक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणीच्या वेळी बघितली जाईल) अर्ज भरताना खालील नमूद केलेली माहिती योग्य रितीने भरणे. 
    • स्वतःबददल पूर्ण माहिती (Personal Information) 
    • शैक्षणिक माहिती (Educational Details) 
    • वैदयकीय माहिती (Medical Information
    • इतर माहिती (Other Information) 
    • ईमेल आयडी 
    • मोबाईल नं.
    • छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करण्यासंबंधी माहिती. 
  • वर नमूद केलेल्या संकेतस्थळांवर MFS Admission 2024  जाऊन वेळोवेळी अर्जाची व परीक्षेची स्थिती तपासणे. परीक्षेच्या काही दिवस अगोदर प्रवेश पत्र उपलब्ध होईल. कोणत्याही प्रकारचे लेखी स्वरुपात कळविले जाणार नाही याची नोंद घ्यावी. शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी दि.२३.०९.२०२४ पासून पुढे व ऑनलाईन परीक्षेची तारीख शारीरिक पात्रता पडताळणीनंतर कळविण्यांत येईल. 
  • शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी ही महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, हंस भुग्रा मार्ग, विदयानगरी, सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०० ०९८ येथे घेण्यांत येईल तर ऑनलाईन परीक्षा आपण निवडलेल्या परीक्षा केंद्रात घेण्यांत येतील. 

शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणीच्या वेळी लागणार महत्वाची कागदपत्रे 

MFS Admission 2024 शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताणीचे वेळापत्रक www.mahafireservice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत येईल. सदर पडताळणीच्या वेळी खालीलप्रमाणे शैक्षणिक मूळ कागदपत्राचा संच तसेच त्याच्या छायांकित प्रती स्वस्वाक्षरीने साक्षांकित करुन आणाव्यात

  • MFS Admission 2024 ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट (रंगीत पासपोर्ट आकाराच्या अलीकडील फोटोसह) 
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे / मार्कशिट १०वी / १२ वी / पदवी परीक्षा उत्तीर्ण तसेच आटीआय/ डिप्लोमा इत्यादी. 
  • सक्षम प्राधिका-याचे जातीचे प्रमाणपत्र (राखीव प्रवर्गातील उमेदरांसाठी ) 
  • जन्म दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला / १० वी चे बोर्ड प्रमाणपत्र. 
  • रहिवाशी दाखला ( तहसिल कार्यालयाने दिलेला) 
  • खेळाचे प्रमाणपत्र ( शालेय / जिल्हास्तर / राज्यस्तर / राष्ट्रीयस्तर) उपलब्ध असल्यास ७. ड्रायव्हिंग लायसन्स (हलका / जड) उपलब्ध असल्यास 
  • एन. सी. सी. प्रमाणपत्र ( ए / बी / सी प्रमाणपत्र ) उपलब्ध असल्यास 
  • नागरी संरक्षण दलाचे प्रमाणपत्र, उपलब्ध असल्यास 
  • होमगार्ड प्रशिक्षण प्रमाणपत्र, उपलब्ध असल्यास 
  • संरक्षण दलात कार्यरत असलेले सैनिक / माजी सैनिक पालकांचे प्रमाणपत्र 
  • वैदयकीय प्रमाणपत्र ( दिलेल्या नमुन्यानुसार वैदयकीय अधिका-याकडून) 

शैक्षणिक कागदपत्राची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणीचे ठिकाण :- 

महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, हंस भुग्रा मार्ग, विदयानगरी, सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०० ०९८ 

इतर माहिती : 

  • अपूर्ण अर्ज गृहीत धरले जाणार नाही. (जसे फोटो, सही, फी न भरलेली) 
  • शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी / शारीरिक चाचणीसाठी येण्याजाण्यासाठीचा प्रवास खर्च व राहण्याची सोय उमेदवारास स्वतःच करावी लागेल. याबाबतचा कोणताही मोबदला दिला जाणार नाही. 
  • आहे त्या स्थितीत व वातावरणात शारीरिक चाचणी घेण्यांत येईल. 
  • स्वखर्चाने परीक्षेसाठी यावे लागेल. 
  • हे प्रशिक्षण केंद्र कोणत्याही प्रकारे होणा-या दुःखापतीस किंवा अपघातास प्रवेश निवड प्रक्रियेस जबाबदार राहणार नाही. याबाबतचे प्रतिज्ञापत्र उमेदवारास दयावे लागेल. 
  • MFS Admission 2024 निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही टप्प्यावर अडचणी निर्माण होऊ नये म्हणून उमेदवाराने पाठयक्रमासाठी अर्ज भरताना त्यातील अटी / शर्ती व्यवस्थित वाचून घेणे गरजेचे आहे. 
  • ज्या वेळेस पाठयक्रम सुरु होणार असेल त्या वेळेस उमेदवाराने हजर होणे गरजेचे आहे. 

टीप : 

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पाहावी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी