Maharashtra Police Bharti 2025-26 | 15 हजार पोलीस भरतीची मोठी संधी! वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही मिळणार अर्जाची संधी
महाराष्ट्रात तब्बल १५ हजार पोलीस भरतीची घोषणा! २०२२-२३ वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही एकदाच अर्जाची संधी. रिक्त पदांचा तपशील व प्रक्रिया जाणून घ्या.

महाराष्ट्र पोलीस भरती 2025
Maharashtra Police Bharti 2025-26 – पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल १५ हजाराहून अधिक शिपाई पदांची भरती होणार आहे. 2025-26 च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हिरवा कंदील मिळाला आहे.
पोलीस भरती वयोमर्यादा सवलत यावेळी एक खास सवलतही देण्यात आली आहे – २०२२ आणि २०२३ मध्ये वयोमर्यादा पूर्ण झाल्यामुळे संधी गमावलेले उमेदवारही यंदा अर्ज करू शकतील. ही सवलत एकदाच देण्यात येणार आहे.
📌 कोणकोणती पदे भरली जाणार?
राज्यात २०२४ मध्ये रिक्त असलेली आणि २०२५ मध्ये रिक्त होणारी पदे भरली जाणार आहेत. त्यात –
- पोलीस शिपाई: १०,९०८
- पोलीस शिपाई चालक: २३४
- बॅण्डस् मॅन: २५
- सशस्त्री पोलीस शिपाई: २,३९३
- कारागृह शिपाई: ५५४
यातील पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत आणि भरती जिल्हा स्तरावरून केली जाईल. परीक्षेसाठी OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.
भरती प्रक्रिया कशी होणार?
- अर्ज मागवणे व छाननी
- शारीरिक चाचणी
- पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा
या संपूर्ण प्रक्रियेचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत.
पदे का भरली जाणे गरजेचे?
Maharashtra 15000 Police Constable Recruitment राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शिपाई संवर्ग महत्त्वाचा घटक आहे. पदे रिक्त राहिल्यास पोलिसांवर कामाचा ताण वाढतो. त्यामुळे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी पदे वेळेत भरण्याचे आदेश दिले आहेत.